ताज्या घडामोडी

नरेंद्र कर्णासे एक ध्येयवेडे व्यक्तिमत्व…

विशेष प्रतिनिधी

हि बातमी ईतर भाषेत वाचा
Share

वरुड (घोराड):अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यात “घोराड” या नावाचे एक अत्यंत छोटस खेडेगाव असून या “घोराड” गावातच इतर सर्वंधर्मिय लोकांप्रमाणेच एक “मातंग समाजाचेही” ते घर आहे आणि याच गावात मातंग समाजातील संजय लोखंडे यांचा परिवार वास्तव्य करीत असे त्यांच्या परिवारात त्यांची पत्नी विद्या आणि त्यांचा दोन मुली दिक्षा आणि खुशबू आहेत,

संजय याच्या परंपरागत व्यवसायामध्ये त्यांची पत्नी त्यांना साथ देत होती दोघेही मोलमजूरी करुन कुटुंबाचा गाडा दोघेच हाकलत होते.
ते कष्ट करून आपल्या दोन्ही मुलींना त्या सावित्रीबाई फुले आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितल्याप्रमाणेच शिक्षण देऊन त्यांना उच्च स्तराच्या नोकरीवर पोहचवनविण्याचे स्वप्न रंगवीत असतांनाच या कुटुंबाला अचानक काळाचीच नजर लागली आणि या कुटुंबाचा कुटुंबप्रमुख संजय लोखंडे यांचे दु:खद निधन झाले.आपल्या पतीच्या दुःखद निधनानंतर कुटुंबाचा दुसरा आधार म्हणून स्वत: आपणच असल्याने आपण रडत बसण्यापेक्षा कमरेला पदर बांधून पुढे होऊन आपल्या मुलींच्या भविष्यासाठी पडेल ते कष्ट करावे लागतील ते करूया अशी गाठ विद्या लोखंडे यांनी बांधली व दोन्हीही मुलींना शाळेमध्ये टाकले.मोठी मुलगी कु.दिक्षा ही घोराडच्याच पुर्व माध्यमिक जिल्हा परिषद शाळेत इयत्ता सातवीत तर लहान मुलगी कु. खुशबू ही पाचवीत असतांनाच,कर्करोगाने श्रीमती विद्या संजय लोखंडेचाही बळी घेतला
या बारा व आठ वर्षांच्या छोट्या छोट्या चिमुकल्या मुलींवर संकटाचे आभाळच कोसळले.
अश्या परिस्थितीत त्या दोन्ही निराधार मुलींना अनेक संकटकांना समोर जाण्याची वेळ आली कारण राहण्यासाठी त्यांना घर नाही,
शेती नाही व इतर कोणतीही मालमत्ता नव्हती.
त्यांच्या खाण्यापिण्याचा खूप मोठा प्रश्न त्यांच्या समोर निर्माण झाला होता.अश्या परिस्थितीतीत लोणी सावंगा येथील त्यांचा मानलेला मामा विनोद सोनागोते यांनी त्यांच्या पडक्या कुडामातीच्या घरावर कापडाची पन्नी टाकून दिली.

ही बातमी वाचा.  आता बच्चू कडूंना घेरण्यासाठी भाजपनं कट्टर विरोधकाच्या माध्यमातून लावली ‘फिल्डिंग’?

अश्यातच घोराड येथीलच एक सेवाभावी व्यक्तीमत्व असलेले नरेंद्र करणासे जे सध्या सध्या वरुडला वास्तव्य करतात, ते एके दिवशी त्यांचे मूळ गाव घोराड येथे येतात आणि गावात येताच त्यांना त्या अनाथ आणि निराधार मुलींच्या बद्दल माहिती मिळते तेव्हा ते या मुलींच्या बद्दल पूर्ण माहिती घेतात आणि त्यांची पूर्ण सत्यता जाणून घेतल्यावर खूपच दुःखी होतात.

नरेंद्र करणासे घोराड वरून वरुडला परत आल्यानंतर रात्रभर त्यांच्या डोळ्यासमोर त्या निराधार मुलींच्या भविष्याची चिंता आणि त्यांना होत असलेला त्रास दिसत असतो व सतत मनातही अनेक प्रकाराच्या विचारांनी गर्दी केलेली असते,

आई आणि वडीलही नसलेल्या त्या चिमुकल्या मुलींचे काय होईल त्या कशा काय जिवन जगतील?
या स्वार्थी आणि लबाड जगामध्ये कोण त्यांना आश्रय देईल,
असे शेकडों प्रश्न त्यांना वारंवार अस्वस्थ ते करु लागतात.म्हणून सकाळी उठल्या नंतर अस्वस्थ मनानेच का होईना समाजाने आणि गावाने दुर्लक्षीत केलेल्या या दोन्ही अनाथ निराधार मुलींसाठी मानवतेच्याच भावनेतून आपण मदत केलीच पाहिजे ही भावना त्याच्या मनामध्ये घट्ट बसते म्हणून त्यावर त्यांनी खूप विचार केला आणि सर्वप्रथम स्वतः आपलाच एक महिण्याचा पगार दान करुन आधी त्यांना राहण्यासाठी सहारा म्हणून घर बांधून देण्याचा मनामध्ये ठाम निर्धार करतात.
परंतु एका महिन्याच्या पगाराने आणि एकट्याने त्यांना पक्के घर बांधून देणे सहज आणि सोपे असे काम नाही परंतू अशक्य पण नाही, या विचाराने त्यांनी त्या अनाथ मुलींना एक पक्के घर बांधून देण्याचा ठाम निर्धार केला.
आणि आपल्याच स्वत:च्या त्या सुनियोजित नियोजनाप्रमाणे त्यांनी आपल्याच मोबाईलवर.व्हाट्सअँप “निवारा” या नावाचा एक ग्रुप तयार केला.त्यामध्ये त्यानी आपल्याच परिचयातील निरनिराळ्या क्षेत्रामधीलही निरनिराळी उच्चपदस्थ मान्यवर मंडळी व पत्रकार मंडळी जोडलीत.
आणि त्या ग्रुपचा उद्देश  स्पष्ट करुन ग्रुपवरील सर्वांना त्या दोन अनाथ निराधार निरागस मुलींच्या त्या निवा-यासाठी घर बांधण्यासाठी मदत करण्याचे भावनिक आवाहन केलेत आणि त्यांच्या या प्रयत्नाने मदतीचे अनेक हाथ समोर आले.कुणी रोख पैशाच्या रुपात तर कुणी घरासाठी आवश्यक विटा,रेती,सिमेंट,लोहा,गिट्टी तर कुणी दरवाजेही दिलेत आणि पाहता पाहता त्यांची संकल्पना पूर्ण झाली.
आणि आज त्या दोन्हीही अनाथ निराधार मुलींसाठी त्यांचे स्वतःचे एक 700 चौरसफुट क्षेत्रफळांचे चांगले दमदार पक्के प्रशस्त घर तयार झाले.

ही बातमी वाचा.  शिवसेना तर्फे राष्ट्रवादी चे सलील देशमुख यांचा धुव्वादार प्रचार....

नरेंद्र कर्णासे या ध्येयवेड्या कल्पक तरुणाच्या प्रयत्नात मुंबई मधून मा.पंजाबराव चौधरी, डॉ.शिवहरी घोरपडे,नागपूरवरुन श्री.वसंतराव डबरासे, डॉ. हरिभाऊजी कातोडे,माणिकरावजी निस्वादे,प्रदिपभाऊ कर्णासे, रोशन कर्णासे इत्यादी मंडळींनीही उदारपणे या नेक कामासाठी देणग्या दिल्यात. स्थानिक आमदारांनीही तेथे येवून कोरडी सांत्वनाही दिली परंतू अमरावती येथील उदारमनाच्या विलासदादा बामलोटे आणि त्यांच्या पत्नीने दिक्षा आणि खुशबू या दोन्हीही अनाथ अशा निराधार मुलींना आपल्या पगारामधून दरमहा पाच हजार रुपये त्यांच्या उदरनिर्वाहाकरीता आणि शिक्षणासाठी नियमित पाठविणे सुरु केलेले आहे.आज त्या दोन्हीही मुलींचे विटा,सिमेन्टचे एक पक्के घर बांधून तयार झालेले असून त्याला आतापावेतो सुमारे 4 लाख 10 हजार रुपयेपर्यंत एकुण खर्च झाला,
वरुड तहसील कार्यालयामध्ये “ज्येष्ठ लिपिक” पदावर कार्यरत असणाऱ्या नरेंद्र कर्णासे या तरुणाने हे कार्य हाती घेतले नसते तर त्या अनाथ निराधार मुली बेघर आणि शिक्षणाविना राहिल्या असत्या.
नरेंद्र कर्णासे यांच्यावर फुले शाहू आंबेडकर आणि लोकसंत गाडगे महाराजांच्या पुरोगामी विचारांचाही फार मोठा प्रभाव असून त्यांच्याच समाजोपयोगी संदेशालाही प्रेरणादायी समजूनच ते आपली वाटचाल करीत असतात.
सध्याच्या या,स्वार्थी जगात तर कोणीही आणि कुणाकडेही अनाथ निराधार गरजू लोकांना मदत करणे तर दूरच पण त्यांच्या कडे साधे ढुंकून पहायलाही वेळ नाही.नोकरदार पांढरपेशी वर्गाला तर मुळीच नाही…
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या आरक्षनाच्या भरोशावर नोकरीपेशा आणि पांढरपेशी लोक मी आणि माझा परिवार यामध्येच गुंतलेले असतात व त्यांचे जग फक्त त्यांच्या कुटुंबापुरतेच असते,
परंतु आजच्या अश्या परिस्थितीत आणि या स्वार्थी काळात सुद्धा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत लोकसंत वंदनीय गाडगे महाराज यांनी दिलेल्या संदेशाप्रमाणे भुकेलेल्यांना अन्न तहानलेल्यांना पाणी उघड्या नागड्यांना वस्त्र गरीब मुलामुलींना शिक्षण,रुग्णांना औषधोपचार तर बेघरांना हक्काचा निवारा अश्या विचाराने भारावलेल्या नरेंद्र कर्णासे यांच्या मानवतावादी कार्यासाठी त्यांना व त्यांच्या कार्याला आणि जिद्दीला अगदी मनापासून सलाम….!!

ही बातमी वाचा.  शिवसेना राज्यातील सर्वच निवडणुका लढणार-आद.उद्धव ठाकरे साहेब

Share

मुख्य संपादक - सागर उर्फ मनोहर डबरासे

यह पोर्टल संपादक मालिक प्रकाशक सागर उर्फ मनोहर डबरासे द्वारा कार्यालय दर्शन एक्सप्रेस न्युज दीक्षित नगर नारी रोड नागपूर से प्रकाशित किया गया हैं, प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही! प्रकाशित किसी भी लेखन पर आपत्ती होने पर उनका निस्तारन सूचना प्रौद्योगीकी( प्लॅटफॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता ) विनिमय 2021 की तहत किया जायेगा!

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.