
(वरुड प्रतिनिधी)
वरुड: वरुड तालुका व नगर परिषद हद्दीतील नागरिकांचे प्रश्न प्रलंबित असून, वारंवार तहसील कार्यालयात निवेदन दिल्यानंतरही कुठलीच ठोस कार्यवाही करण्यात आलेली नाही. २०/०८/२०२५ व १४/०७/२०२५ रोजी निवेदनाद्वारे सविस्तर माहिती देऊनही प्रशासनाने केवळ वेळकाढूपणा केला आहे. त्यामुळे येत्या दि. १६ सप्टेंबर २०२५ रोजी मंगळवारपासून तहसील कार्यालय, वरुड येथे आक्रोश जनशक्ती संघटनेचे अध्यक्ष सुशिल बेले आमरण उपोषणास बसणार आहेत.२०/०८/२०२५ रोजी मांडलेले तालुक्यातील प्रमुख प्रश्न
१) तहसील कार्यालय येथे सी.सी.टी.व्ही कॅमेरे बसविणे.
२) गारपीटाचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात के.वाय.सी. करूनही जमा न झालेले तात्काळ जमा करणे.
३) पुनर्वसन निधीतून करण्यात आलेल्या कामात झालेला भ्रष्टाचार – अनेक गावांमध्ये दर्जाहीन कामे; स्पेशल थर्ड पार्टी ऑडिट करून दोषींना ब्लॅकलिस्ट करणे.
४) प्रधानमंत्री विमा योजना २०२३–२४ व २०२४–२५ अंतर्गत शेतकऱ्यांना विमा न मिळणे; तात्काळ जमा करणे.
५) पांधन रस्त्याचे निकृष्ट काम व त्यास जबाबदार अधिकारी व साहित्य पुरवठादारांवर कारवाई.
६) पात्र रेशनकार्डधारकांचा सर्व्हे करून लाभार्थ्यांना तात्काळ रेशन मिळावे; रद्द अर्ज निकाली काढावेत.
७) १ एप्रिल २०२४ पासून झालेल्या अवैध रेती वाहतुकीवरील महसूल विभागाची माहिती जाहीर करणे.
८) शेतकऱ्यांचे वन्यप्राण्यांकडून नुकसान; पंचनामा करून ९०% मोबदला तातडीने देणे.
९) प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांच्या फेरफारसाठी शासकीय आदेशानुसार कार्यवाही न करणे; त्रास देणाऱ्या अधिकाऱ्यांवर निलंबन.
१०) सततच्या पावसामुळे पिकांचे नुकसान; पंचनामे करून अतिवृष्टी जाहीर करणे.
११) महावितरणकडून कमी व्होल्टेजमुळे नागरिकांना त्रास; ट्रान्सफॉर्मरची क्षमता वाढवणे.
१४/०७/२०२५ रोजी मांडलेले नगर परिषद हद्दीतील प्रश्न
१) नगर परिषद हद्दीतील कामांच्या निविदा काढूनही कामे अपूर्ण; दोषींवर कारवाई.
२) सुवर्ण जयंती नागरीस्थान योजनेत कोट्यवधींचे विजकाम; वापरलेले जुने साहित्य गायब – चौकशी करणे.
३) नवीन आठवडी बाजारपेठ कधी सुरु होणार याची माहिती.
४) २०२२ ते २०२५ दरम्यान झालेली सर्व कामे निकृष्ट; जिल्हा व राज्य नगर विकास विभागाकडून चौकशी करून दोषींवर कारवाई.
५) नगर परिषदेचे मुख्य प्रवेशद्वार नेहमी खुलं ठेवणे.
६) सौर ऊर्जा हायमास्ट लाईट्सची देखभाल; मनमानी करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई.
७) तहसील कार्यालयाशेजारी सेल्फी पॉईंट – नागपूरच्या संविधान चौकाप्रमाणे देखावा करण्याचे आश्वासन पूर्ण करणे.
८) सुवर्ण जयंती नागरीस्थान योजनेत रेस्ट हाऊस ते मटन मार्केटपर्यंत सीसी रोड, नाली व विद्युतीकरण तात्काळ सुरु करणे.
९) सामाजिक भवन सभागृहाचे अपूर्ण काम व मालकीबाबत चौकशी.
या सर्व मागण्यांवर ३१/०७/२०२५ व ३१/०८/२०२५ पर्यंत कार्यवाही करावी असा स्पष्ट आदेश दिल्यानंतरही एकही मागणी पूर्ण करण्यात आलेली नाही. प्रशासनाने जनतेची फसवणूक केली आहे.त्यामुळे येत्या दि. १६ सप्टेंबर २०२५ पासून तहसील कार्यालय, वरुड येथे आक्रोश जनशक्ती संघटनेचे अध्यक्ष सुशिल बेले आमरण उपोषणास बसणार असून, उद्भवणाऱ्या परिणामास शासन व तहसील प्रशासन जबाबदार राहील असा इशारा सुशील बेलेनी दिला आहे.



